Sunday, 30 August 2020

कोरोना महाराष्ट्र विरोधीपक्ष व्हाया भारत .

 सन्मानीय विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते . कोरोनाची स्थिती रुग्णांच्या सोयीसुविधा याबाबत त्यांनी हॉस्पिटल यांना  भेटी देऊन विचारपूस केली ..

त्यामुळे त्यांचं पहिल्यादा आभार . राज्यसरकारच्या कार्यक्षमतेवर बोट ठेवत कोरोनावर मात  करण्यासाठी कोणते पण निर्णय घ्या पण निर्णय घ्या असा टोला मुख्यमंत्री यांना लगावला . हे करत असताना केंद्र सरकारच्या कारभाराकडे मात्र त्यांनी सपशेल डोळेझाक केली . आपला तो बबड्या आणि दुसऱ्याचं ते कारट असल्याचं त्यांचा सूर होतो . मुळात विरोधी पक्षानं नको त्या गोष्टीमध्ये जास्त हस्तक्षेप केल्याचं चित्र आहे . सुशांत सिंगचा प्रकरण फुगवण्यात विरोधी पक्षाचा मोठा वाट आहे . अर्थव्यवस्था रामभरोसे आहे . लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत . केंद्र सरकारने घोषित केलेल्या पॅकेजच काय झालं याचा मोठा प्रश्न आहे . हा पण याच दरम्यान मुकेश अंबानी ,अदानी यांची गाडी मात्र सुसाट आहे . मुंबई मधल्या छत्रपतीशिवाजी महाराज  विमानतळावर अदानी यांनी ताबा मिळवला आहे . गूगल ने रिलायन्स मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे .सरकारी bsnl मात्र व्हेंटिलेटर वर आहे . राफेल भारतात आलं पण भारतामध्येच शस्त्रसामग्री  बनवणारी HAl मात्र खाजगी होत आहे . देशाचे पंतप्रधान मोरांच्या सोबत भारी भारी फोटो काढत आहेत . देशाच्या मीडियाला सुशांत शिवाय काहीच दिसत नाहीय .आणि तरुणाई मात्र १८०० रुपयाचा हिशेब लावण्यात व्यस्त आहे .. देशाची काळजी फक्त कंगना रानावतला आहे . आंध्रप्रदेश सरकार दिवसाला गाईवरती  एक रुपये २० पैसे खर्च करण्यात मंजुरी दिली आहे . त्याचवेळी एका रुग्णाने उपचार मिळाला नसल्यामुळं रुग्णालयाच्या दारातच रुग्णाचा जीव गेला होता